‘मी अडकले तर तुम्हाला सगळ्यांना अडकवेन’

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची पूर्णपणे बदलली आहे. सीबीआय, ईडी आणि आता एनसीबी सुद्धा या प्रकरणाचा तपास करत आहे. एनसीबीकडून शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळं आता रियावरही अटकेत टांगती तलवार कायम असल्याचं बोललं जात आहे. यामुळे आता रियानं हालचाल करायला सुरुवात केली असल्याचं दिसून येत आहे. ज्या प्रमाणे शौविकची चौकशी झालेली आहे, त्याच आधारे आता रियाचीही चौकशी केली जाणार असल्याचे कळते.

एनसीबीकडे आता पुरावे म्हणून रियाचे चॅट्स आणि शौविकचा कबुली जबाब आहे. त्यामुळे रियाला या प्रकरणात अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रियाला अटक करवून घ्यायची नाहीय. म्हणून तिने आपल्या गॉडफादरला मेसेज दिला आहे. हा मेसेज दिला आहे स्मिता पारेखने.

स्मिता पारीख ही सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी झटणारी कार्यकर्ती आहे. जस्टिस फॉर सुशांतची जागा आता जस्टिस फॉर मी ने घेतली आहे. स्मिता पारीख मध्ये आणि रियामध्ये व्हॉट्सएप चॅट होत असून, रियाने तिच्या करता मेसेज दिला आहे.

मला अटक झाली तर मी तर अडकेनच पण तुम्हाला सगळ्यांना मी अडकवेन असा इशारा तिने या आपल्या गॉडफादरला दिला आहे. रियाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशावेळी रियाने मेसेज करून आपला हुकमी एक्का बाहेर काढला आहे. शौविक एनसीबीला म्हणाला, ड्रग्ज कधी घ्यायचे. कधी घ्यायचे नाहीत ते रिया सांगायची. त्यावरून रियाचे ड्रग पेडलरशी संबंध होते हे तर उघड आहे. रिया ड्रग पोचवायची हे उघड आहे. यावरुन रिया ड्रग्ज मागवायची हे निश्चित झालं आहे.

You might also like