रियाने वर्षभरात महेश भट्ट यांना इतक्या वेळा केला फोन

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्ती हिची शुक्रवारी म्हणजेच ७ ऑगस्ट २०२० रोजी ८ तास कसून चौकशी करण्यात आली. यात तिच्या फोन कॉल्स रेकॉर्डदेखील समोर आले आहे. वांद्रे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्याव्यतिरिक्त रिया अन्य एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या संपर्कात होती.
मला सर्व प्रकारचे चित्रपट करायचे आहेत – अलाया
रियाच्या फोन कॉल्स रेकॉर्डनुसार, तिने वर्षभरामध्ये वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांनी १ हजार १९२ वेळा फोन केला होता. भाई शौविक चक्रवर्तीला १ हजार ६९ वेळा संपर्क केला. रिया आणि तिची मॅनेजर श्रुती यांच्याच ७९१ वेळा फोन झाला होता. रियाने आई संध्या चक्रवर्ती यांनी ५३७ वेळा फोन केला होता.
सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर रिया महेश भट्ट यांच्या संपर्कात होती. तसंच संपूर्ण वर्षभरामध्ये रियाने १६ वेळा महेश भट्ट यांनी फोन केला होता. सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर रिया आणि महेश भट्ट यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसंच २० ते २४ जानेवारी २०२० या कालावधीत रियाने सुशांतला २५ वेळा फोन केला होता. या काळात सुशांत चंदीगढमध्ये त्याच्या बहिणीच्या घरी होता. तर वर्षभरात तिने सुशांतला केवळ १४५ वेळा फोन केला होता.