तापसी पन्नू पाठोपाठ रेणुका शहाणेंना २९ हजारांचं वीजबील

नुकतंच  तापसी पन्नूला ३६ हजारांचं वीजबील पाठवण्याचा पराक्रम वीज कंपनीने केल्यानंतर त्यापाठोपाठ आता  रेणूका शहाणेंनासुध्दा २९ हजारांचं वीजबील पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे रेणुका यांचा पारा चढल्याने त्यांनीही  फोटो ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

तसंचअचानक बिलामध्ये लक्षणीय वाढ कशी काय झाली हा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. . ‘मे महिन्यात माझे वीजबिल ५५१० रुपये होते. त्यानंतर जून महिन्याच २९,७०० रुपये आले. या महिन्याच्या बिलामध्ये मे आणि जूनचे एकत्र बिल देण्यात आले आहे. तुम्ही मे महिन्याचे बिल १८०८० रुपये दाखवले आहे… पण माझे बिल ५५१० रुपयांवरुन १८०८० रुपये कसे झाले?’ हे कोडं उलगडण्यासाठी रेणुका यांनी कंपनीला ट्विटच्या माध्यमातून विचारलं आहे.

You might also like