सई आणि अमेयच्या ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांची गोड केमिस्ट्री दाखविणाऱ्या गर्लफ्रेंड या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. जन्मापासून सिंगल असणाऱ्या मुलाला जेव्हा अचानक गर्लफ्रेंड पटते, तेव्हा घडणारी इंटरेस्टिंग गोष्ट या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आली आहे.
या चित्रपटात अमेय आणि सईने नचिकेत आणि अलिशा यांची भूमिका साकारली आहे. उपेंद्र सिधये यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर रणजित गुगळे आणि अनिश जोग यांची निर्मिती आहे. सईचा या ट्रेलरमधील लूक हा वाखाणण्याजोगा आहे. तर अमेय ही थोडा जाड दिसत असून त्याची भूमिकाही हटके असेल असे एकूणच या ट्रेलरवरुन दिसत आहे.