रवी किशनची मुलगी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

भोजपुरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार रवी किशनची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रवी किशनची मुलगी रीवा ‘सब कुछ मंगल है’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पद्मिनी कोल्हापुरे, अक्षय खन्ना, निर्माते प्रदीप शर्मांचा मुलगा प्रियांक यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, येत्या मार्चपासून सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. करण कश्यप या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून नितीन मनमोहन यांची मुलगी प्राची या सिनेमाची निर्मिती करणार आहे.

रीवा म्हणाली की, ‘मी तेव्हा लॉस एंजेलिस आणि लंडन फिरत होती तेव्हा बेग काकांनी मला फोन केला आणि ते म्हणाले की नितीन काकांन मला एका सिनेमाच्या संदर्भात मला भेटायचं आहे.’  ‘बाबांचे सुरुवातीचे काही सिनेमे हे नितीन काकांसोबतच होते.  सध्या मी हा काळ एन्जॉय करत आहे.  हा सिनेमा माझ्यासाठी एक भेटवस्तू आहे ज्याची मला अपेक्षाच नव्हती.’

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like