रवी किशन यांनी दिलं अनुरागला सणसणीत उत्तर….

खासदार आणि अभिनेते ‘रवी किशन’ हे एकेकाळी गांजाचे झुरके मारायचे, आता मंत्री झाल्याने त्यांनी सवय सोडली असेल अशी टीका बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने केली होती. दरम्यान, अनुरागच्या आरोपांवर खासदार रवी किशन यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना रवी किशन म्हणाले कि, “मला अनुराग कश्यप यांच्याकडून अशा शब्दोच्चारांची अपेक्षा नव्हती. ड्रग्सविरोधातील लढ्यात ते मला पाठिंबा देणार नाहीत हे दु:खद आहे”. असं ते म्हणाले.

पुढे रवी किशन म्हणाले, “मी एक शिवभक्त आहे आणि त्यांच्या नावाचा सतत जप करत असतो हे सर्वांना माहित आहे. पण अनुराग कश्यप यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. मी गांजाचे झुरके मारायचो आणि आता मंत्री झालो म्हणून प्रतिमा स्वच्छ ठेवतोय मात्र, त्यांनी असं म्हणणं दु:खद आहे.

‘मी रवी किशनला बर्‍याच काळापासून ओळखत आहे. माझ्या ‘मुक्काबाज’ या चित्रपटात रवीने काम केलं होतं. जय शिव शंकर, जय शिवशंभू असं म्हणत रवी आपल्या दिवसाची सुरवात करतो. त्याने एकेकाळी गांजाचे झुरके मारले आहेत… हे सर्वांना माहित आहे.’ असं अनुरागने बोललं होत.

 

You might also like