रविना टंडनला अमेयची ‘गर्लफ्रेंड’ फार आवडली

येत्या २६ जुलै रोजी अमेय वाघ चा गर्लफ्रेंड हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि त्यापूर्वी आयोजित केलेल्या स्क्रिनिंगमध्ये रविना टंडनने हा चित्रपट पाहिला. रविनाला अमेयची ‘गर्लफ्रेंड’ फार आवडली. आता ही गर्लफ्रेंड म्हणजे अमेयचा आगामी चित्रपट. सई ताम्हणकर आणि अमेयची मुख्य भूमिका असलेला ‘गर्लफ्रेंड’ चित्रपट रविनाला आवडला असून अमेय तिच्यासोबतचा फोटोसुद्धा इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

‘काल रविना टंडनने गर्लफ्रेंड बघितली. तिला खूपच आवडली. मला तर थँक्यू यू पण नीट बोलता येईना. टीप टीप बरसा पानीच्या चाहत्यांना माझा आनंद नक्की समजेल,’ असं कॅप्शन अमेयने रविनासोबतच्या फोटोला दिलं आहे.

उपेंद्र सिधये दिग्दर्शित या चित्रपटात अमेय नचिकेत या मुलाची भूमिका साकारत आहे, ज्याला गर्लफ्रेंड भेटत नसते. उपेंद्र यांनीच या चित्रपटाचं लेखनही केलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती अनिश जोग, रणजित गुगळे, अमेय पाटीस, कौस्तुभ धामणे, अफीफा सुलेमान नाडियादवाला यांनी केली आहे. यामध्ये सईची थोडी हटके भूमिका आहे. याचसोबत चित्रपटात इशा केसकर आणि रसिका सुनील यांच्याही भूमिका आहेत.

You might also like