….म्हणून रॅपर बादशाह अडचणीत

रॅपर बादशाहचे गाणे रिलीज होताच ते व्हायरल होते आणि टॉप ट्रेंडिंगच्या यादीत त्याचा समावेश होतो. त्यातच सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी सेलेब्समध्ये चढाओढ सुरू असते. यात अनेक फेक फॉलोअर्सही सहभागी होतात.
रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात दाखल
यामुळे पोस्टवर फेक व्ह्यूज मिळविल्याचेही सेलेब्सवर आरोप होत असतात. याच प्रकरणी बादशाहला मुंबई पोलिसांनी समन्स पाठविले आहे. मागील महिन्यात सीआययूने एका रॅकेटचा भांडाफोड केला होता. ज्यात फेक व्हयूज आणि फेक फॉलोअर्सला अनेक कलाकारांकडून खरेदी करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल केला होता.
मी कल्पना चावलाची भूमिका साकारू इच्छिते – वाणी कपूर
या प्रकरणी चौकशीदरम्यान बादशाहच्या इंस्टाग्राम अकाउंट बॅडवॉयचे नावही क्राइम इंटेलीजेन्स यूनिटच्या यादीत समोर आले होते. याबाबत सीआययूने 3 ऑगस्ट रोजी बोलविले होते. परंतु तो उपस्थित राहिला नाही. त्यानंतर त्याला पुन्हा 6 ऑगस्ट रोजी हजर होण्यास सांगण्यात आले होते.