तैमूरच्या वडिलांची भूमिका साकारू इच्छितो ‘हा’ अभिनेता

रणवीर सिंहने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जेव्हापासून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही.आपल्या अभिनयाशिवाय रणवीर सिंह हा त्याच्या हाजिरजवाबीसाठीही ओळखला जातो. त्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो अगदी मनोरंजक आहे.

रणवीर सिंहचा करण जोहर याच्या शोमधील एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात करणने रणवीरला विचारले की तुला तीन खान पैकी कोणाच्या वडिलांची भूमिका करायला आवडेल. यावर तो म्हणाला की, मी आणखी कोणा एका खानचे नाव निवडू शकतो? करण जेव्हा होय म्हणतो तेव्हा रणवीरने तैमूर अली खानचे नाव घेतले.

रणवीर सिंह म्हणाला, जेव्हा सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान चित्रपटात काम करेल तेव्हा त्याच्या वडिलांची भूमिका साकारायची आहे. तैमूरने चित्रपटात पदार्पण करण्याची तो आतुरतेने वाट पाहत आहे. अशाप्रकारे रणवीर सिंहने यापूर्वीच हे ठरविले आहे की भविष्यात त्याला कोणाच्या वडिलांची भूमिका साकारायची आहे.

 

You might also like