लॉकडाऊनमुळे रणवीर सिंह मिस करतोय ‘ही’ गोष्ट

रणवीर सिंह सध्या आउटडोर सेल्फी मिस करत आहे. रणवीरने इंस्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला आहे. ज्यात तो समुद्रकिनारी असल्याचे दिसत आहे. यात त्याने ब्लॅक चष्मा घातलेला आहे.
हा फोटो शेअर करत रणवीर म्हणाला, मला माझा सोफा खूप आवडतो. परंतु मला पुन्हा एकदा जुन्या काळात जावे लागेल. मग सेल्फी आहेना. या फोटो शेअरिंग वेबसाइटवर आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लाइक्स् मिळाले आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या जुन्या फोटोत रणवीर ब्लॅक कोट आणि ब्लॅक चष्मात खूपच हॅंडसम दिसतोय. तो लवकरच कबीर खान निर्मित “83′ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट 1983मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्वचषक स्पर्धेवर आधारित आहे.यात रणवीर हा कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय रणवीरचा “जयेशभाई जोरदार’ हा चित्रपटही प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.