दीपिकासाठी काही पण; दीपिकाचे आडनाव लावणार रणवीर ?

लग्नानंतर दीपिकाने दिलेल्या पहिल्या मुलाखतीत तिला, लग्नानंतर तुला दीपिका पादुकोण असेच म्हणायचे की, दीपिका पादुकोण सिंग भवनानी, अशी तुझी ओळख करून द्यायची? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर दीपिकाने मोठे मजेशीर उत्तर दिले. मी आहे, दीपिका पादुकोण, वाईफ ऑफ रणवीर सिंग पादुकोण, असे दीपिका म्हणाली.

दीपिकाच्या या उत्तरावर रणवीरने पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकाच्या प्रेमात अकांठ बुडालेल्या रणवीरने दीपिकासाठी नाव बदलण्याची देखील तयारी दर्शवली आहे.

रणवीर म्हणाला, ”मी माझं आडनाव कधीच वापरत नाही तर दीपिकाचं आडनाव लावायला मला काहीच हरकत नाही.” असे मजेशीर उत्तर त्याने दिले. त्यामुळे दीपिकावरील प्रेमासाठी रणवीर सिंग काहीही करायला तयार असल्याचे दिसतंय.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like