रणवीर-आलियाच्या ‘गली बॉय’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट त्यांच्या करिअरमधल्या सर्वांत उत्तम टप्प्यावर आहेत असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आता पहिल्यांदाच ही जोडी एकत्र झळकणार आहे. ‘गली बॉय’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिवाईन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झाली नाही.१४ फ्रब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like