रणवीर -आलियाच्या ‘गली बॉय’चा टीजर प्रदर्शित

रणवीरचा ‘सिम्बा’ बॉक्स ऑफिसवर धूम करतोय .इतकेच नाही तर ‘सिम्बा’पाठोपाठ रणवीरचा ‘गली बॉय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.काही दिवसा पूर्वी चाहत्यांनी ‘गली बॉय’चा फर्स्ट लूक पाहिला. आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे.

टीजरमध्ये रणवीर रॅप करताना दिसतोय. खास म्हणजे, हे रॅप स्वत: रणवीरने लिहिले आहे. ‘गली बॉय’ मध्ये रणवीर सिंग नावेद शेख नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.टीजरमध्ये आलिया भट्ट व कल्की कोच्लिनची झलकही पाहायला मिळतेय. झोया अख्तरच्या या चित्रपटात रणवीर, आलिया व कल्की या दमदार स्टार्सनी अगदी जीव ओतलाय, हे स्पष्ट आहे.

येत्या ९ जानेवारी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होतोय. १४ फेबु्रवारीला म्हणजेचं व्हॅलेन्टाईन डेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like