….म्हणून राणी मुखर्जीने सोडले सासऱ्यांचे घर

राणी मुखर्जी आणि तिचा पती आदित्य चोप्रा सध्या एका खास कारणाने चर्चेत आहेत . दोघेही नव्या घरात शिफ्ट झाले आहेत आणि हे नवे घर यश चोप्रांच्या बंगल्याच्या अगदी शेजारी आहे.

बॉलिवूड हंगामाने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वीच राणीने त्यांच्या नव्या घरात गृह प्रवेश होता. आदित्य व राणी लग्नानंतर जुहू येथे असलेल्या बंगल्यात राहत होते. हा बंगला यश चोप्रा यांचा होता. पण अचानक आदित्य व राणीने नव्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.

असे का तर, आदित्यला म्हणे, स्वत:च्या हिमतीवर घर घेऊन संसार थाटायचा होता. या घरात स्वत:च्या अटींवर त्याला व राणीला जगायचे आहे. त्यामुळे त्याने नवे घर घेतले असून तो पत्नी आणि मुलीसह स्वत:च्या घरात शिफ्ट झाला आहे.