लवकरच रणवीर – रणबीर येणार एकत्र…?

रणवीर सिंग आणि रणबीर कपूर या दोघांना स्क्रिनवर एकत्र पाहण्याची इच्छा आता पूर्ण होणार आहे. सगळे काही जुळून आले तर लवकरच रणबीर व रणवीर हे दोन सुपरस्टार्स एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. रणबीर-रणवीर एकत्र येणार, हे तर खरे आहे. पण कुठल्या चित्रपटात नाही तर एका जाहिरातीत ते एकत्र दिसणार आहेत.
अद्याप याबद्दलची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण चर्चा खरी मानाल तर, एका शितपेयाच्या ब्रॅण्डने रणबीर-रणवीरला एकत्र आणण्याची तयारी चालवली आहे. या ब्रॅण्डने दोघांशीही संपर्क साधला आहे. अर्थात अद्याप दोघांनीही होकार दिला की नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
महत्वाच्या बातम्या –