रणबीर-आलिया करणार साखरपुडा?

सर्वाधिक चर्चित जोडपे कोणते, तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे. गेल्या वर्षभरापासून या कपलच्या रिलेशनशिपच्या चर्चा आहेत. आता चर्चा आहे, ती या कपलच्या लग्नाची. हे कपल लवकरचं लग्नबंधनात अडकणार, असे म्हटले जातेय. पण त्याआधी येत्या जूनमध्ये हे कपल साखरपुडा करणार असल्याची ताजी बातमी आहे.

‘फिल्मफेअर’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे. ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होण्यापूर्वी दोघेही साखरपुडा करणार, असे मानले जात आहे. ‘ब्रह्मास्त्र’ येत्या ऑगस्टमध्ये प्रदर्शित होत आहे त्यापूर्वी या दोघांनी साखरपुडा करावा अशी नीतू यांच्यासह अख्ख्या कपूर कुटुंबीयांची इच्छा आहे. भट्ट कुटुंबाचीही हीच इच्छा आहे. कुटुंबाच्या इच्छेखातर रणबीर आणि आलिया येत्या जूनमध्ये साखरपुडा करणार आहे ,असे कळतेय. नुकतेच आलियाचे पापा महेश भट्ट यांनी रणबीर व आलिया रिलेशनशिपमध्ये असल्याचे संकेत दिले होते. 

महत्वाच्या बातम्या –

You might also like