रणबीर आणि आलिया फक्त चांगले कलाकार नाही तर …

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला. पण त्याच्या निधानानंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद पेटून उठला आहे. सध्या घराणेशाहीवरून सर्व स्तरातून विरोध केला जात आहे मात्र आता चित्रपट निर्माते आर. बाल्की यांनी घराणेशाही या वादावर त्यांचे मत मांडत संताप व्यक्त केला आहे.

चित्रपट निर्माते आर. बाल्की म्हणाले की,’‘हे नाकारता येण्यासारखे नाही. हे सर्वत्र आहे. आलिया भट्टच्या अभिनयाचे कौतुक करण्याऐवजी लोकं तिला एका चित्रपट निर्मात्यांची मुलगी आहे. म्हणून ट्रोल करत आहेत. आलिया  आणि रणबीर कपूर यांच्या पेक्षा चांगले कलाकार मला शोधून दाखवला आणि मग आपण यावर बोलू. असे बाल्की यांनी म्हटले आहे.

त्यांच्या या विधानावर लेखक अपूर्व असरानी यांनी आर बाल्की यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.लेखक अपूर्व असरानी म्हणाला की,’ ‘मनोज वाजपेयी, राजकुमार राव, विक्की कौशल, आयुषमान खुराना, कंगना रणौत, प्रिंयका चोपड़ा, तापसी पन्नू, विद्या बालन, रिचा चड्ढा असे अनेक कलाकार आहेत. मला रणबीर आणि आलिया आवडतात. पण केवळ तेच चांगले कलाकार नाहीत’ असे अपूर्व यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.’

दरम्यान, सध्याच्या घडीला सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या हाती आहे. ज्याअंतर्गत त्यांनी जवळपास ३५ जणांचे जबाबही नोंदवले आहेत. परंतु पोलिसांच्या हाती अद्याप ठोस कारण सापडले नाही. त्याच्या आत्महत्ये प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी अनेक स्तरांतून होत आहे.

You might also like