राणा – मिहीकाचा असा पार पडला हळदीसोहळा

राणा डग्गुबाती हे सध्या चर्चेत आहे. अलीकडेच राणा – मिही काचा हळदीचा कार्यक्रम पार पडला आणि गुरुवारी मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. राणाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या कार्यक्रमातला फोटो पोस्ट केला आहे.

राणाने हळदीच्या कार्यक्रमासाठी पांढरा शर्ट आणि धोती परिधान केली. तर मिहीका पिवळ्या आणि पांढऱ्या लेंहग्यामध्ये दिसली.सोशल मीडियावर राणाने या फोटोला शेअर केले आहे.  दिलंय. सोशल मीडियावर चाहत्यांकडून व सेलिब्रिटींकडून राणा व मिहीकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

View this post on Instagram

And life moves fwd in smiles 🙂 Thank you ❤️

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati) on

सुरेश बाबू यांनी सांगितले आहे की, राणा आणि मिहिका  8 ऑगस्ट रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. राणा आणि मिहिका यांचा हा विवाहसोहळात दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत पार पडेल. सुरेश बाबू म्हणाले, सध्या देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढला असून लॉकडाऊनही सुरू आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा विवाहसोहळा पार पडेल.

मिहिका ही इंटिरियर डेकोरेटर आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवते.तसेच मिहिका आणि राणा यांच्या कुटुंबातील संबंधही खूप मैत्रीपूर्ण आहेत. दरम्यान, राणा डग्गुबातीचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. विशेषतः “बाहुबली’ चित्रपटामुळे त्याला खूपच प्रसिद्धी मिळाली होती.

 

You might also like