‘हा’ चित्रपट ठरला रमेश भाटकर यांचा अखेरचा चित्रपट

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन झाले आहे. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७० वर्षांचे होते. रमेश भाटकर हे कर्करोगाने ग्रस्त होते.

नुकताच प्रदर्शित झालेला मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. या चित्रपटात ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेत दिसले होते.

रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते. १९७७ ला ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like