‘कंगना रनौतला कार्यालय तोडफोड प्रकरणी नुकसान भरापाई दयावी’

कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयाची मुंबई महानगरपालिकेने तोडफोड केली. याप्रकरणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी आठवले यांनी कंगनाला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
बीएमसीने कंगना रणौतचं मुंबईतील कार्यालय उद्ध्वस्त केलं. कंगना रणौतच्या ऑफिसमध्ये बेकायदेशीर बांधकाम केलं असल्याचं सांगत बीएमसीने तिच्या कार्यावर जेएसबी चालवला. कंगनाने 48 कोटी रुपये खर्च करून या कार्यालयाची जागा खरेदी केली होती.
यावेळी रामदास आठवले म्हणाले की, ‘मुंबईमध्ये कंगना रनौतच्या कार्यालयाची जी तोडफोड झाली, यासंदर्भात मी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत चर्चा केली. कंगनाला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली. बीएमसीने ज्या पद्धतीने कंगनाच्या संपत्तीचे नुकसान केले आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. कंगनाला न्याय मिळाला पाहिजे,’ असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.