राज्य सरकारला निष्कर्ष काढण्याची एवढी घाई का झाली आहे?

सुशांतसिंह राजपूतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली असल्याचा अहवाल एम्सने दिला आहे. हा अहवाल आल्यानंतर शिवसेनेने भाजपवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर राम कदम यांनी शिवसेना आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. असं असताना राज्य सरकारला निष्कर्ष काढण्याची एवढी घाई का झाली आहे?, सुशांतच्या कुटुंबीयांचा वारंवार अवमान केला जात असून शिवसेना नेत्यांनाही झालंय तरी काय?, असा सवाल करतानाच कदाचित शिवसेना नेत्यांना आत्मसाक्षात्काराचा आशीर्वाद प्राप्त झाला असावा, असा टोला भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेला लगावला आहे.
सुशांतसिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करण्याचा सामना आणि महाराष्ट्र सरकारने जणू विडाच उचलला आहे. शिवसेना नेत्यांना काय झालं माहीत नाही. कदाचित त्यांना आत्मसाक्षातकाराचा आशीर्वाद प्राप्त झाला असावा, अशी टीका राम कदम यांनी केली आहे.