दीपक कलालची ‘लाईव्ह धुलाई’

यु ट्यूबर दीपक कलाल आपल्या ‘ऊटपटांग’ व्हिडिओसाठी ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी दीपक कलाल आणि राखी सावंतसोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत होता.

आता राखी सावंतचा हा ‘बनता बनता  राहिलेला नवरा’ पुन्हा एकदा चर्चेत आहेत. पुन्हा एका व्हिडिओमुळे. पण हा व्हिडिओ एकदम वेगळा आहे.या व्हिडिओत दीपक कलाल बेदम मार खातांना दिसतोय. तूर्तास तरी हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. यात एक व्यक्ती दीपकला चांगलाच चोप देतोय. शिवाय तुझ्या ‘ऊटपटांग’ व्हिडिओमुळे मुले बिघडत आहेत, असा आरोप करताना दिसतोय. विशेष म्हणजे, दीपक रडत रडत पुन्हा असे व्हिडिओ शेअर करणार नसल्याचे म्हणतोय.

मारणा-या व्यक्तिने जाणीवपूर्वक दीपक कलालची ‘लाईव्ह धुलाई’ केली, असेही काही वृत्तात म्हटले गेले आहे. अर्थात काही लोकांच्या मते, हा सुद्धा दीपक कलालचा एक पब्लिसिटी स्टंट आहे. शेवटी पब्लिसिटीसाठी काहीपण…ही दीपक कलालची जुनी सवय आहे.

महत्वाच्या बातम्या –