राखी साकारणार चेटकीणची भूमिका

‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ या नावाने प्रसिद्ध असलेली राखी सावंत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. विशेष म्हणजे या ना त्या कारणामुळे चर्चेत राहणारी राखी यावेळी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. राखी लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
राखी झी टिव्हीवरील ‘मनमोहिनी’ या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेमध्ये राखी एका चेटकिणीची भूमिकात दिसणार आहे.राखीने एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली असली तरी मालिकेच्या निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
‘आयुष्यात मी सारं काही करुन पाहिलं. चित्रपट असो किंवा टीव्ही सीरियल आणि रिअॅलिटी शो. पण हॉरर मालिकेत किंवा चित्रपटात काम करण्याची कधी संधी मिळाली नव्हती. मात्र ‘मनमोहिनी’च्या माध्यमातून माझी ती इच्छाही पूर्ण झाली आहे’, असं राखी म्हणाली.
‘मनमोहिनी’ ही एका चेटकिणीच्या जीवनावर आधारित मालिका असून ती तिचं प्रेम मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या मालिकेत रियहाना मल्होत्रा आणि अंकित सिवाच मुख्य भूमिकेत झळकले आहेत. आतापर्यंत या मालिकेचे ३९ भाग प्रसारित झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –