सुशांत माझ्या पोटी पुनर्जन्म घेणार – राखी सावंत

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.  तर आता  बॉलिवूडमध्येही घराणेशाहीवरुन नवा वाद सुरु झाला आहे. यामध्येच राखी सावंतने एक अजब वक्तव्य करुन अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सतत चर्चेत येणारी राखी, ‘ड्रामा क्वीन’ या नावाने ओळखली जाते. विशेष म्हणजे यावेळीदेखील तिने असंच एक वक्तव्य करुन नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

“मी रात्री झोपले असताना अचानक माझ्या स्वप्नात सुशांत आला आणि त्याने मी तुझ्या पोटी पुनर्जन्म घेणार आहे, असं सांगितलं. मात्र त्याच्या या वाक्याचा अर्थ मला समजला नाही. त्यामुळे हे कसं काय शक्य आहे असा प्रतिप्रश्न मी त्याला विचारला. त्यावर तू लग्न कर त्यानंतर मी तुझ्या पोटी जन्म घेईन असं त्याने सांगितल्याचं”, राखीने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

You might also like