राकेश रोशन यांना कॅन्सर; हृतिक रोशनने केला खुलासा

सोनाली बेंद्रे, इरफान खान,आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप आणि नफीसा अली यांच्या पाठोपाठ राकेश रोशन यांनाही कर्करोगाचं निदान झालं आहे. काही तासांपूर्वी खुद्द हृतिक रोशनने याबाबतचा खुलासा केला.

हृतिकनने एक फोटो शेअर करत, याबाबतची माहिती दिली. या पोस्टनंतर राकेश रोशन यांचे तमाम चाहते त्यांच्या लवकर बरे होण्याची कामना करत आहे. अनेक चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना देखील केली आहे.

घर घर की कहानी  या सिनेमाद्वारे त्यांनी आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरवात केली. खून भरी मांग, खेल खेल में, खट्टा मीठा, खुबसूरत यांसह जवळपास ४० सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला. त्यानंतर खुदगर्ज  या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात एन्ट्री घेतली.

महत्वाच्या बातम्या –

You might also like