राकेश बापट आणि रिद्धी डोगरा लवकरच होणार विभक्त…?

राकेश बापट आणि रिद्धी डोगरा यांना लग्नाच्या सात वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे समजते आहे. या दोघांना आता एकत्र राहायचे नसून रिद्धीला राकेशपासून दूर राहायचे आहे. एवढेच नाही तर दोघे घटस्फोट घेण्याचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

‘मर्यादा लेकिन कब तक’ या मालिकेच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर दोघांनी २०११ मध्ये लग्न केले. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रिद्धी आणि राकेशने दिलेल्या अधिकृत विधानानुसार हो आम्ही वेगळे राहत आहोत. हा निर्णय आम्ही एकमेकांसाठी, कुटुंब व स्वतःच्या सन्मान व विचारपूर्वक केला आहे. आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत. आता आम्ही कपल म्हणून नाही राहू शकत. आमची मैत्री पूर्वीसारखी कायम राहणार आहे.

रिद्धी डोगरानेही हे वृत्त फेटाळत, या सगळय़ा बातम्या चुकीच्या असल्याचे तिने सांगितले. तर राकेशने अद्याप याबाबत काहीही भाष्य केलेले नाही.

महत्वाच्या बातम्या –

You might also like