राकेश बापट आणि अनुजा साठे अडकणार ‘व्हॉट्सॲप लव’ बंधनात

राकेश बापट आणि अनुजा साठे हे दोघे ‘व्हॉट्सॲप लव’ बंधनात अडकणार आहेत. येत्या ५ एप्रिल रोजी त्यांचा ‘व्हॉट्सॲप लव’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राकेश बापट  आणि अनुजा साठे पहिल्यांदाचा एकत्र झळकणार आहेत. हेमंतकुमार महाले दिग्दर्शित ‘व्हॉट्सॲप लव’ या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेत चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

व्हॉट्सॲप लव ह्या चित्रपटाची कथा ही सध्या जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या न त्या मार्गाने घडत आहे. कृत्रिम संबंध, भावभावना जोपासताना तारेवरची होणारी कसरत आणि भौतिक सुखाचा माग घेताना सांडत चाललेला खरेपणा आणि आलेले एकाकीपण नव्या संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून कसे घडते, हे चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. व्हॉट्सॲप वापरणाऱ्या प्रत्येकाला हा चित्रपट पाहून आनंद होईल, याची मला खात्री आहे” असे कथालेखक, दिग्दर्शक आणि निर्माता हेमन्तकुमार महाले यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like