राजकुमार राव करणार सुशांत सिंह राजपूतच्या अखेरच्या सिनेमाचे प्रमोशन

सुशांतचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचरा’ हा 24 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असल्याचे काल जाहीर करण्यात आले. त्यानंतर अभिनेता राजकुमार राव याने इंस्टाग्रामवर ‘दिल बेचरा’ सिनेमाचे पोस्टर हार्ट इमोजीसह शेअर केले आहे. राजकुमार राव याने सुशांतच्या अखेरच्या सिनेमाच्या प्रोमोशनची जबाबदारी स्वतः उचलली आहे.
सुशांतची डेब्यू फिल्म ‘काय पो छे’ आणि ‘राब्ता’ या सिनेमात राजकुमार राव याने सुशांत सोबत एकत्र काम केले आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर भावा, तुझी खूप आठवण येईल,अशी भावूक पोस्ट राजकुमार राव याने केली होती.