राजकुमार रावने शेअर केला ‘लाईफ इन ए मेट्रो’च्या सिक्वलचा फोटो

अनुराग बसू यांच्या ‘लाईफ इन ए मेट्रो’ चित्रपटाच्या सीक्वलमध्ये राजकुमार राव काम करीत आहे. त्याने या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो पोस्ट केला आहे. त्याच्यासोबत यात फातिमा सना शेख सहकलाकार आहे. पोस्टमध्ये राजकुमारने लिहिले आहे की, ‘लवकरच तुमच्यासमोर येत आहे. तोपर्यंत एक झलक, असे म्हणत त्याने फोटो पोस्ट केला आहे.

राजकुमार राव हा फोटोमध्ये मिथून चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटातील आयकॉनिक स्टेप करताना दिसत आहे. ८० च्या दशकातील वेशभूषेत फातिमा आणि राजकुमार दिसत आहेत. पहिल्यांदाच राजकुमार राव आणि फातिमा सना शेख स्क्रिन शेअर करीत आहेत. या दोघांशिवाय ‘लाईफ इन ए मेट्रो’च्या सीक्वलमध्ये अभिषेक बच्चन याचीही महत्त्वाची भूमिका आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like