रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या पुन्हा अडकणार विवाहबंधनात

रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या पुढील महिन्यात दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. व्यावसायिक आणि अभिनेता विशागन वनानगामुडी याच्यासोबत सौंदर्या लग्न करणार आहे. चेन्नईमध्ये हा विवाहसोहळा संपन्न होणार असून लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.

२०१० मध्ये सौंदर्यानं चेन्नईस्थित व्यावसायिक अश्विन याच्यासोबत पहिले लग्न केलं होतं मात्र या दोघांच्या वैवाहिक जीवनात वारंवार खटके उडत असल्यानं २०१७ मध्ये तिनं घटस्फोट घेतला. सौंदर्यानं काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे. सौंदर्या आणि विशागन यांचा विवाहसोबळा ११ फेब्रुवारीला पार पडणार आहे.

विशागन वनानगामुडी हा वंजागर उल्लघम चित्रपटात शेवटचा दिसला होता. विशानही घटस्फोटीत आहेत. २०१७ मध्ये त्यानं पत्नीशी घटस्फोट घेतला.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like