राज ठाकरेंनी ‘या’ मराठी सिनेमाचं केलं खास कौतुक!

मराठी चित्रपटाचा दर्जा कायमच मोठा राहिला आहे. अनेक बड्या कलाकारांसह नाटकक्षेत्राची मिळालेली जोड ही मराठी भाषेला मिळालेली देणगीच आहे. भारतात पहिला चित्रपट बनवणाऱ्या दादासाहेब फाळकेंमुळे मराठी माणसाच्या अभिमानाचा आणखीनच भर टाकली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः कलाकार आहेत. त्यांना असलेली कलेची व कलेप्रती असलेली रसिक भावना सर्वश्रुत आहे. मराठी सिनेमांसह रंगभूमीवर असलेलं राज ठाकरेंचं प्रेम याआधी देखील समोर आलं होत. असाच योग मुंबईत पडणाऱ्या धो-धो पावसामुळे जुळून आल्यानंतर राज ठाकरेंनी पाहायचा राहिलेला एक दिग्गज कलाकृती असलेला चित्रपट पाहिला आणि त्यांनी या चित्रपटाचं मनभरून कौतुक केलं आहे.
“आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर 2018 ला जरी रिलीज झाला होता तरी पाहायचा राहून गेला होता. पण बाहेर पाऊस पडत असल्याने घराबाहेर पडणं शक्यच नाही त्यामुळे नेटफ्लिक्सवर मराठी सिनेमे बघताना हा सिनेमा समोर आला आणि एका बैठकीत बघून संपवला. एका शब्दांत सांगायचं तर अप्रतिम सिनेमा. कमालीची उत्तम बांधलेली स्क्रिप्ट, स्क्रिनप्ले आणि अर्थात दिग्दर्शनपण…
भालजी पेंढारकर सोडले तर डॉ. काशिनाथ घाणेकर, वसंत कानेटकर ते प्रभाकर पणशीकर प्रत्येकाला भेटण्याचा योग मला आला होता आणि व्यंगचित्रकार असल्याने प्रत्येकाच्या लकबी मी हेरल्या होत्या. आज सिनेमात प्रत्येक नटाचं काम करताना जाणवलं की ह्या सगळ्यांनी काय जबरदस्त ही सगळी पात्र उभी केली आहेत. सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे, प्रसाद ओक, मोहन जोशी, नंदिता धुरी, वैदेही परशुरामी खरंच सगळ्यांचे अभिनय कडक…!
सिनेमात दाखवलेला काळ मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ होता. कोरोनोत्तर काळात मराठी रंगभूमी अशीच बहरू दे… आणि नटांच्या-संहितांच्या जोरावर तसंच सिनेमात म्हटल्याप्रमाणे नाट्यवेड्या मराठी माणसाच्या प्रतिसादावर पुन्हा नाट्यगृहाच्या बाहेर हाऊसफुल्लचे फलक कायमचे लागू देत…!”
#काशिनाथघाणेकर #मराठीनाटक #मराठीसिनेमा #भालजीपेंढारकर #वसंतकानेटकर #प्रभाकरपणशीकर #DrKashinathGhanekar #MarathiCinema #MarathiNatak #MarathiFilmIndustry@subodhbhave @sonalikulkarni @prasadoak17 @AnandIngale3 pic.twitter.com/YiPMVY4BL4
— Raj Thackeray (@RajThackeray) September 24, 2020
महत्वाच्या बातम्या:-