रितेशच्या ‘या’ ट्विटवर कंमेंट्सचा वर्षाव…

बॉलीवूडसह मराठी सिनेसृष्टी मध्ये काम करणारे रितेश देशमुख नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. रितेश देशमुख नेहमी सोशल मीडियावर कमालीचे पोस्ट शेअर करत असतात, रितेशची पत्नी जेनेलिया सुद्धा सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. अशीच एक पोस्ट सध्या रितेशने सोशल मीडियावर अपलोड केली आहे.

रितेशची हि नवीन पोस्ट सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत असून. रितेशच्या या पोस्ट वर नेटकरी बरेच कंमेंट करत आहेत. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा चालू आहे. अभिनेता रितेश सोशल मीडियावर कमालीचा अ‍ॅक्टिव्ह असतो. रितेशने पोस्ट शेअर करायची देर की, ती व्हायरल झालीच म्हणून समजा. सध्या त्याची एक अशीच पोस्ट बरीच व्हायरल होतेय.

रितेशचे एक गमतीशीर ट्विट आणि त्या ट्विटवर कमेंटचा अक्षरश: पाऊस पडला. या ट्विटमध्ये रितेशने घरातील टीव्ही संचाचा फोटो शेअर केला आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे, या टीव्हीचा फेस उलटा दिसतोय. वास्तूशास्त्रावर विश्वास असणा-यांसाठी… असे लिहित रितेशने ही पोस्ट शेअर केली.

‘वास्तुशास्त्रातील तज्ज्ञांच्या संशोधनानुसार टिव्हीचा फेस उलट्या दिशेने ठेवल्यास घरात आनंद आणि शांती नांदते असे रितेशने आपल्या पोस्टमध्ये लिहिलेले आहे. रितेशच्या या पोस्टने सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तसेच भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग व अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने  देखील या ट्विट वर कंमेंट केली आहे.

You might also like