‘बुलाती है मगर…’फेम शायर राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वोतोरी प्रयत्न करत आहे. मात्र, देशात अनलॉकची घोषणा केल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती, तर अनेक दिग्गजांनाही या रोगाचा सामना करावा लागला आहे. आता, प्रसिद्ध हिंदी आणि उर्दू शायर व गीतकार राहत इंदौरी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

त्यांनी स्वत:च याबद्दल सोशल मीडियातून माहिती दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णलयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

काल त्यांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतःच ट्विट केले होते. त्यामुळे त्यांच्य्यावर कोरोनाचेही उपचार सुरुच होते.

दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा-कौर यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला तात्काळ हलविण्यात आले आहे. नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. मात्र, तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे.

नवनीत राणा यांच्यासह पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जवळपास सहा दिवसांपूर्वी नवनीत राणा यांचा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच उपचार सुरु आहेत.

You might also like