पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला ईडीची नोटीस

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान याच्या अडचणीत वाढ झाली आहे. राहत फतेह अली खानला सक्तवसुली संचालनालया(ईडी)नं नोटीस बजावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायक राहत फतेह अली खान हा परकीय चलनाची स्मगलिंग करत होता. ईडीनं त्याच्याकडून यासंदर्भात उत्तर मागितलं आहे.

राहत फतेह अली खाननं अवैधरीत्या 3,40,000 यूएस डॉलर कमावले आहेत. त्यातील जवळपास 2,25,000 डॉलरची त्यांनी स्मगलिंग केल्याचा आरोप आहे. चौकशीत ईडीचं समाधान न झाल्यास गायक  राहत फतेह अली खानला मोठा दंड भरावा लागू शकतो. जर त्यानं दंड भरला नाही, तर त्याला लूक आऊट नोटीसही पाठवली जाणार आहे. तसेच भारतातील त्याच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –