‘रात अकेली है’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘रात अकेली है’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये अनेक कलाकारांचा भरणा आहेच, शिवाय सस्पेन्सचाही तडका आहे. ‘रात अकेली है’ हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे.

 एका खुनाचा तपास जटिल यादव नवाजुद्दीन सिद्धिकी करत आहे. पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असलेल्या नवाजच्या रडारवर मृताच्या घरातील सर्वच लोक आहेत, ज्यात राधिका आपटेवरही संशयाची सुई आहे. मृत्यूचा उलगडा करण्याच्या प्रयत्नात असलेला नवाज एका जमीनदाराच्या घरी पोहोचतो. तिथे त्याला समजतं की घरात उपस्थित कुटुंबातील लोक काही ना काही लपवत आहे. हे प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नाही, याची जाणीव त्याला होते. असे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

हनी त्रेहान यांच्या दिग्दर्शनाचा हा पहिलाच सिनेमा आहे. हनी त्रेहाननी यापूर्वी “सात खून माफ’,”ओमकारा’ आणि “मकबूल’साठी असिस्टंट डायरेक्‍टर म्हणून काम केले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे रात अकेली है”मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी यामध्ये राधिका आपटेबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे. नवाजुद्दीनसाठी स्वतःची इमेज रोमॅंटिक हिरो म्हणून निर्माण करण्याची ही संधी आहे.नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते. दोघेही ऍक्‍टिंगमधील खिलाडी मानले जात आहेत. 

 

You might also like