आर माधवनला एका मुलीने घातली लग्नाची मागणी, असे दिले माधवनने तिला उत्तर

आर माधवनचा महिला चाहता वर्ग सर्वात जास्त आहे. नुकताच माधवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला होता. त्या फोटोवर एका चाहतीने ‘मी १८ वर्षांची आहे यात काही गुन्हा आहे का? आणि मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’ अशी कमेंट केली. तिची ती कमेंट पाहून माधवनने मजेशीरपणे उत्तर दिले आहे.
‘हाहाहाहा… देव तुझे भले करो… तुला माझ्यापेक्षा कोणीतरी चांगला मुलगा भेटेल’ असे माधवनने त्या मुलीला प्रत्युत्तर दिले आहे. सध्या माधवनचा चाहतीसोबतचा हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.माधवनने शेअर केलेल्या फोटोवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती करण कुंद्राने तर ‘तू फेअर अॅण्ड हॅन्डसम वापरतोस का?’ अशी मजेशीर कमेंट माधवनच्या फोटोवर केली आहे.