‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो प्रदर्शित

सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका असलेली ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सीरिज प्रचंड गाजली. याच प्रेक्षकांसाठी एक खास बातमी आहे. ती म्हणजे ‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो प्रदर्शित झालाय.
‘सेक्रेड गेम्स 2’चा हा प्रोमो पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचणार आहे. कारण ‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये कल्की कोच्लिन आणि रणवीर शौरी या दोघांची एन्ट्री झालीय.
या नव्या प्रोमोत सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत रणवीर शौरी व कल्की कोच्लिन दिसतात. अद्याप ‘सेक्रेड गेम्स 2’ च्या रिलीज डेटची घोषणा झालेली नाही. ‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये किती एपिसोड असणार, ते कधी टेलिकास्ट होणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
Iss khel ka asli baap kaun? pic.twitter.com/epvUzWm4OL
— Sacred Games (@SacredGames_TV) May 6, 2019