प्रियांका चोप्राचा ‘हा’ फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रामाणात व्हायरल

प्रियांका चोप्राने नुकताच ३७व्या वर्षात पदार्पण केले आहे. या वेळेस तिने कुटुंब आणि मित्रांसह एक यॉट पार्टी साजरी केली.

या पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रामाणात व्हायरल होत आहेत. यॉट पार्टीमध्ये प्रियांका सिगारेट ओढताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये निक जोनास, प्रियांका चोप्रा आणि प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा हे तिघेही एका बोटीमध्ये बसून सिगारेट ओढत आहेत. मागच्या दिवाळीत प्रियांकाला आस्थमा झाला होता त्यामुळे तिने भारतीय नागरिकांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते.

त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला तिच्या आस्थमाची आठवण करूण देत ट्रोल केले आहे. त्यानंतर तिच्या लग्नाच्या वेळेस करण्यात आलेल्या आतिषबाजी नंतर नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले होते.

You might also like