‘व्हेंटिलेटर’ नंतर प्रियांका चोप्राचा दुसरा मराठी सिनेमा ‘फायरब्रॅण्ड’ लवकरच नेटफ्लिक्सवर

आजवर अनेक बॉलिवूडकरांनी मराठी सिनेनिर्मितीत पाऊल ठेवलं आहे. मग यात प्रियांका चोप्रा कशी मागे राहणार.  ‘व्हेंटिलेटर’ सिनेमाच्या यशानंतर तिचा दुसरा मराठी सिनेमा ‘फायरब्रॅण्ड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्रियांकाचे होम प्रोडक्शन पर्पल पेबल पिक्चर्सची निर्मिती असलेला ‘फायरब्रॅण्ड’ हा मराठी सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या २२ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

या सिनेमाची कथा आणि दिग्दर्शनाची धुरा लेखिका-दिग्दर्शिका अरुणा राजे सांभाळत आहेत. आजच्या आधुनिक युगातील नातेसंबंधावर हा सिनेमा भाष्य करतो. या सिनेमात सचिन खेडेकर आणि अभिनेत्री राजेश्वरी सचदेव पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. तर उषा जाधव हिला वकिलाच्या भूमिकेत तर गिरीश कुलकर्णी यांनासुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायलामिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like