पाण्यात बुडता बुडता वाचली प्रियांका……

प्रियांका चोप्राचा सिगारेट ओढतानाचा एक फोटो चांगलाच चर्चेत आला. या फोटोनंतर आता प्रियांका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मियामीमध्ये प्रियांका पार्टी करत असताना तोल जाऊन पाण्यात पडल्याचं दिसून येत आहे.मियामीमध्ये निक आणि प्रियांकासोबत तिची आई मधू चोप्रादेखील आहे.
प्रियांकाचा वाढदिवसाची पार्टी सुरु असताना प्रियांकाचा तोल जाऊन ती पाण्यात पडली. यावेळी निकने प्रियांकाचा पाय पकडून तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीदेखील ती पडली. येथे प्रियांकाने अनेक वॉटरस्पोर्टचा आनंद घेतला असून तिचे जेट स्की चालवतानाचे अनेक फोटो सध्या चर्चेत आहेत.