‘क्वांटिको’च्या सेटवर प्रियांका चोप्रा झाली जखमी

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्येही आपले बस्तान बसवले असून ‘क्वांटिको’ ही मालिका आणि लवकरच प्रदर्शित होणारा ‘ बेवॉच’ या चित्रपटाद्वारे ती आपला जलवा दाखवण्यास सज्ज आहे. प्रियांकांच्या ‘क्वांटिको’ मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत असून तिच्या भूमिकेचेही खूप कौतुक होत आहे, त्यामुळे तिचे चाहतेही खुश आहेत. मात्र याच ‘क्वांटिको’च्या शूटिंगदरम्यान ती जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मालिकेच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी या मालिकेच्या शूटिंगदरम्यान प्रियांका अचानक पडली आणि त्यात तिच्या डोक्याला जखम झाली. तिला उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले व काही तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. सध्या तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तिची प्रकृती उत्तम आहे. ती घरी आराम करत असून येत्या आठवड्याअखेर ती शूटिंगला परत सुरूवात करेल, अशी माहिती प्रियांकाच्या प्रतिनिधीने दिली.
You might also like