प्रिया वॉरियरचे बॉलिवूड पदार्पण वादात; बोनी कपूरने पाठवली नोटीस

प्रिया प्रकाश वॉरियर लवकरच ‘श्रीदेवी बंगलो’ नावाच्या एका सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार आहे. या सिनेमाचं कथानक श्रीदेवी यांच्या आयुष्याशी मिळतं-जुळतं असल्याचे टिझरमधून दिसून येत आहे. परंतु, हा सिनेमा श्रीदेवी यांच्या आयुष्यावर आधारीत आहे किंवा नाही याचा खुलासा मात्र अद्याप झालेला नाही.
या सिनेमाच्या टीझरमध्ये शेवटच्या दृश्यात अभिनेत्रीचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचे दाखवण्यात आले आहे.टीझरमधील सीन पाहिल्यानंतर बोनी कपूर यांनी सिनेमाला नोटीस पाठवली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत माम्बुली यांनी आपल्याला बोनी कपूर यांच्याकडून नोटीस मिळाल्याचं मान्य केलंय.
‘आम्हाला बोनी कपूर यांच्याकडून गेल्या आठवड्यात एक कायदेशीर नोटीस मिळालीय आणि आम्ही त्याला उत्तर देऊच. माझा सिनेमा हा एक सस्पेन्स थ्रीलर असेल. मी बोनी कपूर यांना हेदेखील सांगितलंय की सिनेमात श्रीदेवी हे सामान्य नाव आहे. माझ्या सिनेमाही एका अभिनेत्रीवर आधारित आहे’ असं प्रशांत माम्बुली यांनी आमची सहयोगी वेबसाईट बॉलीवूडलाईफ.कॉमशी बोलताना म्हटलंय.
सिनेमात प्रिया हिच्याशिवाय अभिनेता प्रियांशू चटर्जी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या –