प्रिया बेर्डे यांचा राजकारण प्रवेश निश्चित

प्रिया बेर्डे आता राजकीय पडद्यावर दिसणार आहेत. प्रिया बेर्डे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असून आपल्या करिअरची नवी इनिंग सुरु करणार आहेत. येत्या 7 जुलै रोजी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे.

प्रिया यांच्यासह सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतला नगरकर, सुहासिनी देशपांडे,विनोद खेडेकर, डॉ सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे मिलिंद आष्टेकर या मंडळींचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि इतरांचा पक्षप्रवेश एकाच वेळी होणार असल्याचे समजते.

प्रिया यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृती आघाडीची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली जाणार असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुणे येथील  ‘निसर्ग’ कार्यालयात हा पक्षप्रवे पार पडणार असल्याचे समजते.

 

You might also like