“प्रेमाय नमः” २४ फेब्रुवारी ला प्रेक्षकांच्या भेटीला
अफलातून 'अंडरवॉटर सॉंग' "प्रेमाय नमः" ह्या चित्रपटात!
निखळ प्रेम, श्रावणातल्या वाऱ्याचा मंद झुळुकेने स्पर्श केल्यानंतर मोहोरलेल्यागुलाबाच्या त्या नाजुक पाकळीची अनुभूती! प्रेमाची अनेक रूपं आजतागायत रुपेरीपडद्यावर साकारली गेली आहेत व पुढेही अवतरतील. अशीच एक बहारदार नवीकोरीप्रेमकथा येऊ घातली आहे ‘प्रेमाय नमः’ च्या रूपात. अतिशय निराळी पण मोहक,उत्कट पण शीतल, तीव्र पण नाजूक आणि गंभीर पण मजेशीरसुद्धा.
एका गर्भश्रीमंत कुटुंबातील मुलगा प्रेम (देवेंद्र चौगुले) जो वयोमानाप्रमाणे खट्याळ,अल्लड आहे पण तेव्हडाच संस्कारीही आहे व त्याचे आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेमआहे. जेव्हा प्रीती (रुपाली कृष्णराव) त्याच्या समोर येते तेव्हां तिला पाहून, तिच्यासौंदर्याला भाळून पहिल्याच नजरेत प्रेमात पडतो. जणू काही आज वारा वाहतोय, त्यामाळरोपाच्या लयीत, आणि तुझंच नाव येतंय माझ्या प्रत्येक नव्या ओळीत.. परंतु प्रीतीकाही प्रेमला हवा तसा प्रतिसाद देत नाही. पण नियती त्यांना वारंवार समोरासमोरआणत राहते, तेही गमतीशीर घटनांद्वारे. त्या दोघांच्या कुटुंबातील जुनी दोस्ती व जुन्यानात्यांमुळे प्रेम आणि प्रीती मद्धे मैत्री होते व त्याचे रूपांतर प्रेमात कधी होते हेदोघांच्याही ध्यानात येत नाही. प्रीतीवर जीवापाड प्रेम करण्याऱ्या प्रेमच्या घरी एकगोड निमंत्रण येते आणि त्या उस्तवामद्धे त्याच्यासमोर एक धक्कादायक वास्तव उभेराहते जे त्याच्या कल्पनेपलीकडचे असते. दुष्काळात तेरावा महिना म्हणतातत्याप्रमाणे प्रीतीही प्रेमसमोर एक पेच निर्माण करते. ते गोड निमंत्रण कुठलं आणि कायहोतं? प्रेम आणि प्रीतीच्या प्रेमाचं काय होतं? प्रेम संस्कार, कर्तव्य आणि प्रेम यामधीलकोणाची निवड करतो? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे ‘प्रेमाय नमः’. खरंतर हा चित्रपटम्हणजे उत्कट प्रेमभावना आणि आदर्शवादी संस्कार ह्यांच्या नाजूक कात्रीतसापडलेल्या एका तरुणाची संवेदनशील प्रेमकथा आहे. दिग्दर्शक जगदीशवठारकरांनी कथा, पटकथा, संगीत, लोकेशन्स ई. मद्धे वेगळेपण आणण्याचा स्तुत्यप्रयत्न केलाय. उदा. त्याने मराठी चित्रपटसृष्टीतील इतिहासात प्रथमच एक रोमँटिकगाणे खोल पाण्याखाली चित्रित केले आहे जो चित्रपटाचा महत्वाचा यू एस पी (USP) आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रेमाय नमः हा मराठीतील एकमेव चित्रपट आहे , ज्याने हिंदीच्या धर्तीवर स्वतःचा भन्नाट असा ऑफशियल गेम लाँच केलाय. हा गेम प्ले स्टोर वर उपलब्ध आहे.
उत्तम चोराडे निर्मित प्रेमाय नमः चे प्रेसेंटर आहेत विजय शिंदे, जितेंद्र जोशी व महेश जोके. कथा लिहिली आहे के. शशिकांत यांनी व चंद्रशेखर जनावडेंच्या गीतांवर स्वरसाजचढवलाय संगीतकार के. संदीपकुमार- चंद्रशेखर जनावडे यांनी. देवेंद्र चौगुले वरुपाली कृष्णराव ह्या प्रमुख जोडीबरोबर प्राची लालगे, सुरेखा कुडची, प्रकाशधोत्रे, भरत दैनी, सायली मगदूम, स्नेहालराज यांनी अभिनयाची धुरा सांभाळलीय.



