प्रविण तरडे यांनी कुटुंबियांसोबत मिळून केली शेतात भातलावणी

प्रविण विठ्ठल तरडे यांनी मुळशी त्यांच्या गावात त्यांच्या कुटुंबियांसोबत भात लावणी केली. ‘शेती विकायची नसते ती राखायची असते’ असा संदेश आपल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून देणारे प्रविण विठ्ठल तरडे यांची नाळ आजही आपल्या मातीशी जोडली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
वडील विठ्ठल तरडे यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांशी संवाद साधताना प्रविण तरडे म्हणाले की, “सध्या लॉकडाऊन मुळे शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत यामुळे मी आपल्या कुटुंबियांसोबत शेतात भात लावणी करायला आलो आहे. तसेच कोरोनामुळे यंदा वारी झाली नाही यामुळे आई – वडील शेतात राबत आहेत, अन्यथा ते शेतातील कामं आटोपून वारीला निघालेले असतात. पुणे-मुंबईत कामासाठी गेलेल्या प्रत्येकाने आपल्या मातीशी असलेले नाते कायम जपावे.”