प्रवीण तरडे यांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा

प्रवीण विठ्ठल तरडे यांचा २०१५ साली प्रदर्शित झालेला ‘देऊळ बंद’ चित्रपट अक्कलकोटचे ‘श्री स्वामी समर्थ’ महाराज यांच्या भक्तीवर आधारित होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्यानंतर ‘देऊळ बंद’चा सिक्वल यावा अशी अनेकांनी मागणी केली होती. पाच वर्षानंतर प्रविण तरडे यांनी ‘देऊळ बंद’च्या सिक्वलची घोषणा केली असून लवकरच ‘देऊळ बंद 2 ..आता परिक्षा देवाची’, हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रवीण तरडे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे त्यांच्या आगामी ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाची घोषणा केली. विशेष म्हणजे रविवारी गुरुपौर्णिमा असल्याच्या निमित्ताने या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी अन्य कोणताही चांगला दिवस नसल्याचं म्हणत त्यांनी ही घोषणा केली आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे करत असून निर्मिती जयश्री कैलास वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी करणार आहेत. हा चित्रपट पुढच्या गुरुपौर्णिमेला म्हणजेच २३ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र अद्यापतरी या चित्रपटातील कलाकारांची नावं मात्र गुलदस्त्यातच आहेत.

You might also like