प्रतीक बब्बर अडकणार विवाहबंधनात

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा सनई- चौघडे वाजणार आहे. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर आज म्हणजेच २२ जानेवारी सान्या सागरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. लखनऊमध्ये हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. पुढचे दोन दिवस इतर कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.

अभिनय क्षेत्रात प्रतीक विशेष कामगिरी करु शकला नाही. प्रतीकची होणारी पत्नी सान्या ही लखनऊमधल्या राजकीय नेत्याची मुलगी आहे. सान्या २७ वर्षांची आहे. ती फॅशन डिझायनर आहे. सान्या आणि प्रतीक गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. गेल्यावर्षी जानेवारी माहिन्यात या दोघांनी साखरपुडाही केला होता.

महत्वाच्या बातम्या –

You might also like