सुशांतच्या मृत्यू प्रकरणावर प्रसून जोशींनी सोडलं मौन

एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार केली होती. एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
दरम्यान, “आत्महत्या हा एक आजार असून माझ्यासाठी हत्येपेक्षा मोठी चिंता ही आत्महत्या आहे”, असं वक्तव्य प्रसिद्ध लेखक प्रसून जोशी यांनी केलं. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावर त्यांनी पहिल्यांदाच आपलं मत व्यक्त केलं.
प्रसून जोशी म्हणाले, “माझ्यासाठी आत्महत्या हा हत्येपेक्षा मोठा चिंतेचा विषय आहे. कारण हत्या प्रकरणात दोषी कोण आहे हे समजतं. पण आत्महत्या हा आजार आहे. या आजाराशी लोक झुंज देऊ शकत नाहीयेत. ते असुरक्षित आहेत. ही कोणती छोटी गोष्ट नाही. इंडस्ट्रीने या विषयाकडे गंभीररित्या पाहणं गरजेचं आहे. फक्त हिट चित्रपटांची निर्मिती करणं एवढचं इंडस्ट्रीचं काम नाही. आयुष्य हे चित्रपटांपेक्षा फार मोठं आणि महत्त्वाचं आहे.”