श्रावण सुरु झाला म्हणून प्राजक्ता करणार या खास गोष्टी

अभिनेत्री प्राजक्ता माळीनेसुध्दा श्रावणात यंदा अनेक गोष्टी करण्याचं ठरवलं आहे.याबाबतच तिने नुकतंच तिने सोशल मिडीयावरुन सांगितलंय. प्राजक्ता म्हणते, श्रावण सुरू सत्वगुणप्रधान महिना आहे. त्यामुळे मांसाहारी पदार्थ, मद्यपान आणि धुम्रपान पूर्णपणे वर्ज्य करा. मी तर या गेष्टी करतच नाही. म्हणून मी या वेळेस श्रावणात या पुढील महत्त्वाच्या खास गोष्टी करणार आहे. रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय जप. रोज २ तास ध्यान (पद्मसाधना)
दरम्यान, श्रावण महिना दरवर्षी उत्साह,आनंद, चैतन्य आणि व्रतवैकल्यांचा उत्सव घेऊन येतो. सणांचा महिना म्हणून श्रावणाचं वेगळंच पावित्र्य आहे. हा मंगलमय महिना म्हणून ओळखला जातो. संपूर्ण वर्षातला श्रावणात सोमवार, शनिवार या दिवशी उपवास केले जातात. या संपूर्ण महिन्यात सात्विक आहार घेतला जातो.