प्राजक्ता माळीचं ‘मस्त महाराष्ट्र’ एंथम प्रदर्शित

प्राजक्ता माळी एका नव्या कार्यक्रमासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लॉकडाऊनच्या आधीच या कार्यक्रमासाठी प्राजक्ताने चित्रीकरण केलं होतं. महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात जाऊन महाराष्ट्रचं दर्शन प्राजक्ता या शोमधून घडवणार आहे. या कार्यक्रमासाठी प्राजक्ता संपूर्ण महाराष्ट्र फिरली आहे. या कार्यक्रमाचं टायटल एंथम प्रदर्शित झालं आहे.
यात प्राजक्ताने या प्रवासादरम्यान काय काय धमाल केलीय हे पाहायला मिळतय. महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे वेगळेपण, तेथील वैशिष्ट्य याचं दर्शन या कार्यक्रमात पाहायला मिळेल. या एंथमला अमित राज यांचं संगीत लाभलं आहे. हर्षवर्धन वावरे आणि कस्तूरीने हे गाणं गायलं आहे. क्षितीज पटवर्धन यांनी हे गाणं लिहील आहे.